Advertisement

आ.संग्राम जगताप यांना पितृशोक !

प्रजापत्र | Friday, 02/05/2025
बातमी शेअर करा

नगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी (Arun Jagtap) आ.अरुण काका जगताप यांचे गुरुवार (दि.१) रोजी रात्री पुण्यात निधन झाले. ते २०१६ ते २०२२ या कालावधीत विधान परिषदेचे सदस्य होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर (Pune)पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्यानंतर गुरुवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अरुण जगताप हे अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि नगर शहराचे प्रतिनिधीत्व करणारे (Sangram Jagtap) संग्राम जगताप यांचे वडील होते. त्यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तसेच अहमदनगर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

 

Advertisement

Advertisement