Advertisement

नागरिकांची सहनशिलता संपतेय,जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी शिथिलतेचा वेळ वाढवावा-आ.धस

प्रजापत्र | Friday, 29/05/2020
बातमी शेअर करा

आष्टी-केंद्र सरकारच्या नियमानुसार ज्या जिल्ह्यात एकवीस दिवसात एकही कोरोना रुग्ण आढळला नाही तर तो जिल्हा रेड झोनमध्ये असला तर आॅरेज झोन आणि आॅरेज झोन मध्ये असला तस ग्रीन झोन मध्ये येतो.निकषानुसार बीड जिल्हा कागदावर जरी नसला तरी ग्रीन झोन मध्ये समावेश होणे अपेक्षित आहे.त्यानुसार कदाचित एक-दोन दिवसात घडलेही मात्र नागरिकांची सहनशिलता आता संपतेय याचा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी विचार करून संचारबंदी शिथिलतेचा वेळ वाढवावा अशी मागणी आ.सुरेश धस यांनी केली. 
                           आष्टी शहरात सोमवारी सकाळी सात ते साडेनऊ या संचारबंदी शिथीलतेच्या वेळेत आ.सुरेश धस यांनी शहरात येऊन पाहणी केली.यावेळी तहसिलदार निलीमा थेऊरकर,नगर पंचायतच्या मुख्याधिकारी शारदा दळवी,पोलिस निरीक्षक माधव सुर्यवंशी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.यावेळी आ.धसांनी शहरातील व्यापा-यांकडे जाऊन त्यांचे गा-हाणे ऐकून घेत प्रत्येक व्यापा-यांनी आपल्याला वेळ पुरत नसल्याने ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होत असल्याचे सांगितले.तसेच पोलिस आणि नागरिकांतही हामरी तुमरीचे प्रकार वाढले आहेत.परिणामी पोलिसही वैतागले असून,लोकही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत.त्यामुळे आ.सुरेश धस यांनी बीड जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार करत आपला जिल्हा केंद्र सरकारच्या निकषानुसार ग्रीन झोनमध्ये आहे.त्यामुळे नागरिकांनी देण्यात येणारी शिथीलता अडीच ऐवजी पाच तासांची द्यावी जेणे करून नागरिकांची गर्दी होणार नाही,तसेच सध्या काही परिसरात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरीही शेतीतील कामे उरकून घेत असून,बि-बियाणांच्या खरेदी करण्यासाठी गडबड करु लागला आहे.त्यामुळे यासर्व बाबींचा गंभीर विचार करून केंद्र सरकारने दिलेल्या नियमांनुसार आपल्या जिल्ह्याला शिथिलती मिळावी अशी मागणी आ.सुरेश धस यांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे.

Leave a comment

Switch to plain text editor

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Advertisement

Advertisement