बीड (प्रतिनिधी):- एका हॉटलच्या प्रांगणात डीजे लावून बारबालांना घेऊन नाचत अश्लिल हावभाव केल्या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबलने दिलेल्या फिर्यादीनुसार आमदाराच्या स्वीय सहाय्यकासह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व पाचही आरोपी बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील असून त्यामध्ये अनेक प्रतिष्ठीतांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुणे जिल्ह्यातील मौजे मळवली ता. मावळ येथील कृष्णा व्हिलाच्या प्रांगणात दि. १२ एप्रिल रोजी मध्यरात्री २ वाजता राजेश शाम जाधव (वय ४०) रा. पाटोदा, शरद ज्ञानोबा बामदळे (वय ३१) रा. पाटोदा, रोहित श्रीमंत भोसले (वय २९) रा. पारगाव ता. पाटोदा, सुशील अंकुशराव ढोले (वय ३३) रा. पाटोदा, दर्शन दिलीप कांकरिया (वय ३५) रा. पाटोदा हे मोठमोठ्याने साऊंड सिस्टीम वाजवून बारबालांना गाण्याच्यातालावर नाचवून अश्लिल हावभाव करत मिळून आले. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल नागेश्वर कमठणकर यांच्या फिर्यादीवरुन लोणावळा ग्रामीण परिश्र पोलीस ठाण्यात ५ जणांविरुद्ध भा.दं.वि. कलम २९४, ३४, म.पो.का. कलम ३३ (एन) १३१, ११०, ११२/११७ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास वरिष्ठांच्या आदेशावरून पो. ह. वाळुजकर करीत आहेत. दरम्यान या पाच जणांमध्ये एक आमदाराचे स्वीय सहाय्यक असल्याचे समजते.

प्रजापत्र | Thursday, 13/04/2023
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा