Advertisement

टिप्पर,बोलेरोचा भिषण अपघात

प्रजापत्र | Saturday, 19/09/2026
बातमी शेअर करा

 बीड दि.१९(प्रतिनिधी): भरधाव बोलेरो जीप आणि टिप्परची समोरा समोर भिषण धडक होऊन झालेल्या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. हा अपघात आज सकाळी बीड शहराजवळील महालक्ष्मी चौक ते छत्रपती संभाजीराजे चौक बायपास रोडवर घडला. जखमींवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
बीड शहराजवळुन जाणाऱ्या बायपासवर आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास टिप्पर आणि बोलेरोची समोरा समोर धडक झाली. या अपघातात शिवकन्या बडे, नंदा बडे, राणी बडे, अभिषेक बडे आणि गायत्री कचरे हे पाच जण जखमी झाले आहेत. या जखमींपैकी नंदा बडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.बडे कुटुंब हे पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथील रहिवाशी असुन ते बोलेरो गाडीमधुन अक्कलकोटच्या दिशेने जात होते. बीड बायपास रोडवरी पांगरबावडी ब्रिजजवळ टिप्परने अचानक वळण घेतल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement