बीड दि.११(प्रतिनिधी): पोळा सणाच्या निमित्ताने मानाचा बैलांच्या मिरवणुकीवरून अंथरवनपिंपरी येथे दोन गटात तुंबळ हाणामारीची घटना घडली आहे. यामध्ये १० ते १२ जण जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यातील जखमींवर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून येथे उपचार सुरू आहेत.
बीड जिल्ह्यात सततच क्षुल्लक कारणावरून हाणामारीच्या घटना घडत असून, त्याचे व्हिडिओ व्हायरल करणं हा एक ट्रेंड झाल्याचे दिसून येत आहे. काल गुरुवार (दि.१०) बैल पोळा सण होता. या सणावर दुष्काफाचे सावट प्रकर्षाने दिसून आले आहेत.पोळ्याच्या दिवशी मानाच्या बैलांच्या मिरवणुकीवरून मोठा वाद उफाळून आला. दोन गट आमनेसामने येऊन हातात काठ्या, लाठ्या घेऊन हल्ला चढवला आहे. यावेळी काहींनी घरात घुसून मारहाण केल्याचा उल्लेख आरोप केला जात आहे. या मारहाणीच्या घटनेत तब्बल १० ते १२ जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. या जखमींवर बीड येथे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात काहीजणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

बातमी शेअर करा
