बीड दि.११(प्रतिनिधी): बीड-नवगण राजुरी मार्गावरील उकंडा तळ्याजवळ गुरुवार (दि. १०) रोजी रात्री ट्रक आणि दुचाकीच्या भीषण अपघातात तिघा मित्रांचा जागीच मृत्यु झाला. या घटनेने नवगण राजुरी गावावर शोककळा पसरली आहे.
गुरुवारी रात्री सुमारे अकराच्या सुमारास कैलास गणपत टुले (वय ३०),अक्षय शिंदे (वय २५) आणि ऋषिकेश फुलझळके (२७), (रा.नवगण राजुरी) हे तिघे मित्र दुचाकीवरून गावाकडे जात होते.उकंडा तळ्याजवळ पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी त्यांच्या दुचाकीला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली.धडक इतकी भीषण होती की तिघांचाही जागीच मृत्यु झाला.दरम्यान,पुलाच्या कामाच्या ठिकाणी वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक दिशादर्शक फलक, रेडियम पट्टे अथवा इतर सुरक्षाव्यवस्था नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
बातमी शेअर करा

