Advertisement

दुष्काळ जाहीर करा,शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत करा 

प्रजापत्र | Thursday, 10/09/2026
बातमी शेअर करा

नागपूर : महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचे प्रमाण ४० ते ४५ टक्क्यांनी कमी झाले असून, खरीप हंगाम अडचणीत आला आहे. रब्बी हंगामासमोरही संकट उभे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते आ. रोहित पवार यांनी गुरुवारी केली.

रोहित पवार यांनी शरद पवार यांच्या सूचनेनुसार राज्यातील विविध भागांचा दौरा करून वस्तुस्थिती जाणून घेतली. मराठवाड्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि आता विदर्भातील परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर गुरुवारी नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्यासोबत बैठक घेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा  केली. यावेळी माजी आ. प्रकाश गजभिये, नागपूर जिल्हाध्यक्ष सलील देशमुख, वेदप्रकाश आर्य आदी उपस्थित होते. यानंतर पत्रकारांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, दुष्काळ जाहीर करण्यासोबतच शेतीवर अवलंबून असलेल्या मजुरांना मदत, शेतकऱ्यांच्च मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य, पशुधनासाठी मदत आणि पिण्याच्या पाण्यासाठी टँकर उपलब्ध करून देण्याची तसेच रोजगार हमी योजनेची व्याप्ती वाढविण्याचीही गरज आहे.

Advertisement

Advertisement