Advertisement

जनावरांसाठी कडबा कुट्टी करताना शेतकऱ्याचा मृत्यू 

प्रजापत्र | Thursday, 10/09/2026
बातमी शेअर करा

आष्टी दि.10(प्रतिनिधी): तालुक्यातील चिखली येथील एका शेतकऱ्याचा गोठ्यातील जनावरांसाठी कडबा कुट्टी करत असताना अचानक विजेचा जोरदार करंट लागून जागीच मृत्यू झाला.

बळीराजाच्या सर्वात लाडक्या आणि सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या 'पोळा' सणाच्या दिवशीच बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आष्टी तालुक्यातील चिखली येथील एका शेतकऱ्याचा गोठ्यातील जनावरांसाठी कडबा कुट्टी करत असताना अचानक विजेचा जोरदार करंट लागून जागीच मृत्यू झाला. शहाजी लक्ष्मण आवारे (वय ४४ वर्षे, रा. चिखली, ता. आष्टी) असे दुर्दैवी अंत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ऐन सणाच्या दिवशी घडलेल्या या भीषण दुर्घटनेमुळे आवारे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण चिखली गावावर शोककळा पसरली आहे.

Advertisement

Advertisement