बीड दि.८(प्रतिनिधी): धुळे-सोलापूर महामार्गावरील संभाजी महाराज चौकाजवळील जुगार अड्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने सोमवार (दि.७) रोजी रात्री कारवाई केली असून १५ लाख ११ हजार ८८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करत नऊ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.
बीड शहरासह ग्रामीण भागातील अवैध धंद्यांवर कारवाई सुरू असतानाच धुळे-सोलापूर महामार्गावरील संभाजी महाराज चौकाजवळ जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.वेंकटराम यांच्या पथकाला माहिती मिळाली या माहितीच्या आधारे सोमवार (दि.७) रोजी रात्री उशिरा कारवाई करत जुगार खेळणाऱ्या नऊ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत तब्बल १५ लाख ११ हजार ८८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत,अपर पोलीस अधीक्षक समीर शेख उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि श्री.सय्यद, पोह.राहुल शिंदे, अशोक दराडे, पोअं.अविनाश सानप,संतोष रणदिवे, कुलदीप औसरमल, शशिकांत ढाकणे आणि विशाल जगताप यांनी केली.

बातमी शेअर करा
