Advertisement

७० हजारांची लाच घेताना तलाठी पकडला

प्रजापत्र | Tuesday, 18/08/2026
बातमी शेअर करा

बीड दि.१८(प्रतिनिधी) : अवैध वाळू वाहतुकीसाठी सहकार्य करण्याच्या मोबदल्यात ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना गेवराई तालुक्यातील तलाठ्याला छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवार (दि.१८) रोजी पकडले. 

  अवैध वाळू वाहतुकीसाठी सहकार्य करण्याच्या बदल्यात गेवराई तालुक्यातील खामगाव सज्ज्याचे तलाठी विलास राजेंद्र मोराळे यांनी संबंधिताकडे लाचेची मागणी केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर तक्रारीची पडताळणी करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचत ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना विलास मोराळे यांना पथकाने मंगळवार (दि.१८) रोजी ताब्यात घेतले.सदरील कारवाई छत्रपती संभाजीनगर पथकातील भास्कर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रकरणी संबंधित तलाठ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

 

Advertisement

Advertisement