Advertisement

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना

प्रजापत्र | Saturday, 25/07/2026
बातमी शेअर करा

दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वातावरण ढवळून निघालेले असताना सगळ्यांचे लक्ष केंद्र सरकारच्या निर्णयाकडे लागले होते. शनिवारी दुपारी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. हे वृत्त समोर आले असतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले आहेत. 

 

दिल्लीत गेल्या दोन दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. संपूर्ण आठवडात संसदेत कोणतेही कामकाज होऊ शकले नाही. त्याचबरोबर आंदोलकही राजीनाम्यावर ठाम होते. अखेर राजीनामा प्रधान यांनी राजीनामा घेतला. याच दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याचे कारण कळू शकलेले नाही.आंदोलकांनी शनिवारी होणारी चर्चा धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय होणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे केंद्र सरकार काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले होते. केंद्र सरकारकडून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा दुपारी घेण्यात आला. 

 

Advertisement

Advertisement