Advertisement

  विजेचा धक्क्याने मजुराचा मृत्यु 

प्रजापत्र | Wednesday, 01/07/2026
बातमी शेअर करा

गेवराई दि.१(प्रतिनिधी): तालुक्यातील कोळगाव येथे फरशी धुण्याचे काम सुरू असताना विजेचा जबर धक्का लागून राजस्थानमधील एका मजुराचा मंगळवार (दि.३०) रोजी मृत्यु झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 
   मृत मजुराचे नाव राजेशकुमार बिरबल सैनी (वय ३०), रा. राजस्थान असे आहे. कोळगाव येथील एका नव्याने बांधण्यात आलेल्या घरात फरशी बसविण्याचे काम सदरील राजस्थानी मजुरांनी घेतले होते. दरम्यान घरातील फरशी काम पूर्ण झाल्यानंतर राजेशकुमार सैनी हे मशीनच्या सहाय्याने फरशी धुवून स्वच्छ करत होते. याचवेळी मशीनमधून किंवा विद्युत पुरवठ्यातील बिघाडामुळे त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी आणि सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.  

Advertisement

Advertisement