Advertisement

नसरापूरच्या नराधमाला फाशीच!

प्रजापत्र | Monday, 29/06/2026
बातमी शेअर करा

 पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिचा निर्दयीपणे  खून करण्यात आल्याच्या खटल्यात आरोपी भीमराव कांबळे (वय ६५) याला आज (सोमवारी, ता २९) कोर्टाकडून शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयाने मागे गुरुवारी (दि. २५) झालेल्या सुनावणीत कांबळेला या प्रकरणात दोषी ठरविले होते. त्यामुळे कांबळेला फाशी होणार की जन्मठेप, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आज त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे, गुन्हा घडल्यानंतर अवघ्या दोन महिन्यात निकाल लागला आहे. अत्याचार महिन्यांत खटल्याची सुनावणी पूर्ण आणि खून खटल्यात सर्वात जलदगतीने निकाली लागलेला हा राज्यातील पहिलाच खटला ठरला आहे. आरोपीला आज पुणे जिल्हा सत्र न्यायालयात विशेष न्यायाधीश एस. आर. साळूंखे यांनी फाशीची शिक्षा सुनावली आहे. 

Advertisement

Advertisement