Advertisement

परळीत थार गाडीने एकाला उडवीले

प्रजापत्र | Sunday, 21/06/2026
बातमी शेअर करा

परळी दि.२१ प्रतिनिधी): दुचाकी व थार या चारचाकी वाहनाच्या झालेल्या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला होता. जखमीला तातडीने उपचारासाठी अंबाजोगाई येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. येथे उपचारादरम्यान मृत्यु झाल्याचे आज रविवारी (दि.२१) सकाळी उघडकीस आले. 
    प्रशांत प्रल्हाद देशमुख रा.परळी असे मयताचे नाव आहे. ते रात्री संत भगवानबाबा चौक ते तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरुन प्रवास करीत असताना त्यांना एका थार या चारचाकी वाहनाची धडक बसल्याने अपघात घडला. या अपघातात प्रशांत देशमुख हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथे उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. या अपघात प्रकरणी देशमुख कुटुंबाने तक्रार केली असून, धडक लागल्यानंतर संबंधित थार चालक मात्र घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेने परळी शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Advertisement

Advertisement