Advertisement

लेफ्टनंट जनरल धीरज सेठ लष्करप्रमुख 

प्रजापत्र | Saturday, 13/06/2026
बातमी शेअर करा

दिल्ली: लेफ्टनंट जनरल धीरज सेठ आता देशाचे नवे 'चीफ ऑफ आर्मी स्टाफ' अर्थात लष्करप्रमुख असणार आहेत. शनिवारी सरकारने यासंदर्भात घोषणा केली. सेठ ३० जूनपासून या पदाचा कार्यभार स्वीकारतील.

  राष्ट्रपतींच्या अनुमतीने लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची ३० जून पासून चीफ ऑफ आर्मी स्टाफपदी नियुक्ती करण्यात येत आहे. व्हाईस जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्याकडून ते पदभार स्वीकारतील असं संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.लेफ्टनंट सेठी सध्या व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ पदावर कार्यरत आहेत. यंदा एप्रिल महिन्यात त्यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला होता. लेफ्टनंट सेठ हे पुण्याजवळच्या खडकवासला इथल्या नॅशनल डिफेन्स अकादमीचे विद्यार्थी आहेत. डिसेंबर १९८६ मध्ये ते लष्करात रुजू झाले. संघटनात्मक काम, क्षमता विकास प्रशिक्षण, डावपेचात्मक असा ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव सेठ यांच्याकडे आहे.

Advertisement

Advertisement