Advertisement

नीट आणि जेईई परीक्षा आता एकत्रच होणार?

प्रजापत्र | Saturday, 23/05/2026
बातमी शेअर करा

दिल्ली :परीक्षेतील पेपरफुटी आणि गैरव्यवहारामुळे देशभरात गदारोळ माजला असतानाच, केंद्र सरकारने आता देशातील परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याची तयारी सुरू केली आहे. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या ‘JEE’ आणि ‘NEET’ या परीक्षा एकत्र करून ‘एकच संयुक्त राष्ट्रीय प्रवेश परीक्षा’ (Joint Entrance Exam) घेण्याबाबत केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत आहे. संसदीय समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांनी यासंबंधीचे संकेत दिले आहेत.

 

 

कशी असेल नवीन परीक्षा पद्धत?

या पध्दतीमुळे कालांतराने JEE आणि NEET सारख्या परीक्षा एकाच सामायिक चौकटीखाली आणल्या जाऊ शकतील, ज्यामध्ये विविध शाखांसाठी विषयांचे घटक मात्र स्वतंत्र असतील. शिक्षण, महिला, बाल, युवक आणि क्रीडाविषयक संसदीय स्थायी समितीच्या अनेक सदस्यांनी या ‘सिंगल टेस्ट स्ट्रक्चर’च्या कल्पनेला पाठिंबा दिला आहे. या रचनेत अभियांत्रिकीच्या इच्छुकांसाठी ‘गणित’ आणि वैद्यकीय क्षेत्रातील उमेदवारांसाठी ‘जीवशास्त्र’ असे स्वतंत्र विभाग असतील. अभियांत्रिकीसाठी विद्यार्थ्यांना गणित विषयाचा पेपर द्यावा लागेल. वैद्यकीय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जीवशास्त्र विषयाचा पेपर द्यावा लागेल. मुख्य आराखडा एकच असला, तरी विद्यार्थ्यांच्या करिअरच्या निवडीनुसार विषयांचे वर्गीकरण केले जाईल.

Advertisement

Advertisement