Advertisement

नीटच्या पुनर्परीक्षेची तारीख जाहीर

प्रजापत्र | Friday, 15/05/2026
बातमी शेअर करा

दिल्ली : सरकारच्या निर्देशांनुसार NTA नं रद्द केलेली NEET ची पुनर्परीक्षा होणार आहे. परीक्षा रद्द करताना यासंदर्भात एनटीएनं माहिती दिली होती. रद्द झालेली परीक्षा नेमकी कधी होणार? याबाबत परीक्षार्थींमध्ये मोठा संभ्रम होता. आता एनटीएनं नीट पुनर्परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार, येत्या २१ जून रोजी रविवारी नीटची पुनर्परीक्षा पार पडणार आहे. परीक्षेची तारीख जाहीर झाल्यामुळे आता विद्यार्थ्यांना त्यादृष्टीने अभ्यास व इतर नियोजन करणं शक्य होणार आहे. यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विद्यार्थ्यांसाठी पुनर्परीक्षेदरम्यान देण्यात येणाऱ्या नव्या सुविधांची माहिती दिली.

  नीट परीक्षेचे पेपर आधीच फुटले होते, अशी बाब गेल्या आठवड्यात उघड झाली. त्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर काही क्लासचालक व प्रशिक्षण केंद्रचालकांनीच हे पेपर मुलांना हजारो रुपयांना विकल्याचाही धक्कादायक प्रकार समोर आला. या पार्श्वभूमीवर देशभरातील विद्यार्थ्यांना याचा भुर्दंड सोसावा लागणार असून नीट परीक्षेच्या फेऱ्यातून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा अभ्यास करून ही परीक्षा द्यावी लागणार आहे.

Advertisement

Advertisement