Advertisement

दुसऱ्या टप्प्यात मतदानाचा टक्का वाढला

प्रजापत्र | Thursday, 23/04/2026
बातमी शेअर करा

पुणे : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी सात ते नऊ या दोन तासात ८.०१ टक्का इतके मतदान झाले आहे. या निवडणुकीसाठी ३ लाख ८४ ,हजार ५७९ मतदार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात सकाळी ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के मतदान झाले आहे. उन्हाची तीव्रता असल्याने दुसऱ्या टप्प्यात अनेक नागरिक मतदानासाठी बाहेर आल्याचे दिसून आले आहे. 

 

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी आज, गुरुवारी (दि. २३) मतदान होत असून, या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार रिंगणात उतरल्या आहेत. त्यांच्यासह एकूण २३ उमेदवार निवडणूक लढवत असले तरी प्रमुख विरोधी पक्षाचा दमदार उमेदवार नसल्याने ही निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, बारामती विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख ८४ हजार ५७९ मतदार असून, त्यामध्ये १ लाख ९० हजार ६८४ महिला, १ लाख ९३ हजार ८७१ पुरुष आणि २४ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. मतदानासाठी ४७८ केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून, ५७३ ईव्हीएम, ६२१ व्हीव्हीपॅट आणि ५७३ बॅलेट युनिट्स सज्ज ठेवण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर उद्याचे मतदान केवळ राजकीयच नव्हे, तर भावनिक दृष्ट्याही महत्त्वाचे ठरणार असून, बारामतीकर कोणाला कौल देणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Advertisement

Advertisement