संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरजवळील समृद्धी महामार्गावर (Samruddhi Expressway) एक भीषण अपघात (Accident News) घडला आहे. जांबरगाव शिवारात भरधाव कारने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झालाय. हि धडक इतकी भीषण होती कि धडकेनंतर कार तब्बल १०० फूट फरफटत (Accident News) गेल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अपघातास्थळी अग्निशामक दलाने तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. यात कारमधील दोन प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र चालकाचे पाय अडकले असल्याने त्याला बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या.
दरम्यान, बचावकार्य सुरू असतानाच कारने अचानक पेट घेतला आणि मोठा भडका उडाला. या आगीत चालक पवन अजमेरा (वय ५२) यांचा जागीच होरपळून दुर्दैवी मृत्यू झालाय. या अपघातात ईशा अजमेरा आणि विना अजमेरा हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भीषण अपघाताने परिसरत एकच खळबळ उडाली असून सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

