Advertisement

अखेर बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार

प्रजापत्र | Thursday, 09/04/2026
बातमी शेअर करा

पुणे : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीतील दिग्गज नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. महायुतीतील प्रमुख नेत्यांनी उपस्थित राहून पवार यांच्या उमेदवारीला बळ अन् पाठिंबा दिला. तसेच लक्ष्मण हाके यांनी माघार घेत सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे हे सुद्धा रिंगणात उतरले होते. अखेर सुनेत्रा पवार यांच्या विनंतीला मान देत काँग्रेसने आज बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेतल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे. 

Advertisement

Advertisement