पुणे दि.२८(प्रतिनिधी): राज्यभरामध्ये गेल्या काही दिवसांपासून पोलीस भरती
प्रकिया राबवली जात आहे. आज सकाळी पुणे यथील शिवाजीनगर पालीस मुख्यालयाच्या मैदानात मैदानी चाचणीत धावताना एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यु झाला. भरती प्रक्रियेत आतापर्यंत तिघा जणांचा धावताना मृत्यु झालेला आहे.
आज पुणे येथे शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात मैदानी चाचणी सुरू होती. पुरुषोत्तम बारकुल (वय २३ वर्षे, रा. देऊळगाव राजा जि. बुलढाणा) हा तरुण धावत असताना अचानक कोसळला. त्णयाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पोलीस भरतीप्रक्रिया सुरू आहे. बीड आणि संभाजीनगर येथेही मैदानी चाचणीत धावताना दोघा जणांचा मृत्यू झालेला आहे. ही राज्यातली तिसरी घटना आहे.
बातमी शेअर करा

