शिरूर कासार दि.२८(प्रतिनिधी): तालुक्यातील हिवरसिंगा येथील पत्र्याच्या शेडचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी शेडमध्ये बांधलेल्या लहान मोठ्या अश्या दहा शेळ्या लंपास केल्याची घटना गुरुवार (दि.२६) रोजी भरदिवसा घडली असून एकूण ५४,००० हजारांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी शिरूर कासार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून शिरूर कासार तालुक्यातील हिवरसिंगा येथील सचिन सुभाष बडे (वय ३६) यांच्या बीड-शिरूर रोडवरील पत्र्याच्या शेडचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी शेडमध्ये बांधलेल्या मोठ्या ४ शेळ्या, २ लहान बोकड, ४ लहान शेळ्या अश्या एकूण लहान मोठ्या दहा शेळ्या गुरुवार (दि.२६) रोजी चारचाकी मध्ये येत भरदिवसा चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली असून ५४,००० हजारांचा ऐवज लंपास केल्या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध शिरूर कासार पोलीस ठाण्यात शुक्रवार (दि.२७) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तालुक्यात भरदिवसा अश्या घटना घडत असून पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे बोलले जात आहे. सदरील घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पुढील तपास पो.ह श्री.तांदळे हे करत आहेत.

