Advertisement

 वाळू वाहतूक करणारे दोन हायवा पकडले

प्रजापत्र | Saturday, 07/02/2026
बातमी शेअर करा

चकलांबा दि.७ (वार्ताहर): बोरगाव फाटा येथील गोदापात्रातून अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच शुक्रवार (दि.६)रोजी दोन हायवावर कारवाई करत ५० लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करत करण्यात आला असून चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   बीड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पोलिसांचा अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईचा सपाटा सुरु असून गेवराई तालुक्यातील बोरगाव परिसरात शुक्रवार (दि ६) रात्री ८ च्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या टिमने पाठलाग करून दोन वाळूने भरलेल्या हायवावर कारवाई करत एकूण ५० लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून सर्फराज राजू पठाण (वय २९) रा.महारटाकळी ता.गेवराई जी.बीड व अशोक दत्तात्रय रकटे (वय ३६) रा.मुंगी ता.शेवगाव जी.आहिल्यानगर या दोघांवर चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई पोलिस अधीक्षक नवनित कॉवत, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि शिवाजी बंटेवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि खटावकर,श्री.यादव, बबन सलगर, विकास राठोड, अंकुश वरपे यांनी केली असून पुढील तपास सुरु आहे.

Advertisement

Advertisement