भूम - अतिवृष्टीने शेताचे नुकसान झाल्याने भूम तालुक्यातील मात्रेवाडी या गावातील लक्ष्मण बाबासाहेब पवार (वय 42 वर्ष) या शेतकऱ्याने गावात जनावराच्या गोठ्या गळफास घेऊन आपले आयुष्य संपवलं आहे.पवार यांची शेत जमीन नदीच्या काठावर होती दोन दिवस झालेल्या पावसाने पिकासह जमीन खरवडून गेल्याने दोन दिवसापासून ते तणावात असल्याचे बोलले जात आहे.त्यांच्या पश्चात आई ,पत्नी आणि तीन मुले आहेत.
धाराशिव जिल्ह्यात दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीने शेतीचे मोठं नुकसान झाले आहे. हे नुकसान कसे भरून काढायचे हा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडला आहे.
पवार यांच्यावर दोन ट्रॅक्टरचे कर्ज होते त्यांच्या शेतात शेतात कांदा आणि सोयाबीन पीक होते जमीनच. खरवडून गेल्याने पीक ही गेलं त्यामुळे ट्रॅक्टरचे कर्ज कसे फेडायचे या विविंचणेत त्यांनी आपले जीवन. संपवले असल्याचे बोलले जात आहे.
आज धाराशिब जिल्ह्यात राज्याचे दोन उपमुखमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार आणि पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर तसेचआपत्ती निवारण व जलसंधारण हे तीन मंत्री अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले असताना ही घटना घडली आहे.सरकारने तात्काळ मदत जाहीर केली तर तणावात असलेल्या शेतकऱ्यांना आधार मिळेल