Advertisement

सरकारी ‘लाडक्या बहिणीं’वर शिस्तभंग

प्रजापत्र | Thursday, 21/08/2025
बातमी शेअर करा

 मुंबई - राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki bahin Yojana) योजनेचा लाभ घेतलेल्या जवळपास १२ हजार सरकारी महिला अधिकारी, कर्मचारी यांना आता शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

महिला आणि बालकल्याण विभागाने माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या मदतीने केलेल्या छाननीत या महिला कर्मचाऱ्यांनी (Ladki bahin Yojana) लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आले आहे. त्यासंबंधीची माहिती राज्य सरकारच्या संबंधित विभागांना पाठविण्यात आली आहे.राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा लाभ आतापर्यंत अनेक महिलांनी घेतला. त्यातील काही लाभार्थी बनावट निघाले आहेत. काही ठिकाणी तर पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे.त्यातच आता सरकारी नोकरीत मोठा पगार घेणाऱ्या काही महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki bahin Yojana) योजनेचा लाभ घेऊन शासनाचीच दिशाभूल केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सरकारने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, कठोर कारवाईची तयारी सुरू केली आहे.या प्रकरणी महाराष्ट्र नागरी सेवा नियमातंर्गत आवश्यक ती कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल महिला व बाल विकास विभागास उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश ग्राम विकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

 
 

Advertisement

Advertisement