Advertisement

सर्पदंशाने अडीच वर्षांच्या मुलाचा मृत्यु 

प्रजापत्र | Saturday, 21/06/2025
बातमी शेअर करा

परळी वैजनाथ दि.२१ (प्रतिनिधी): तालुक्यातील (Parli Vaijnath) गाढे पिंपळगाव येथील सार्थक शिवाजी पोईनकर या अडीच वर्षीय मुलाचा घरातच सर्पदंशाने जागीच मृत्यु झाल्याची घटना शनिवार (दि.२१) सकाळी घडली आहे.        .
          

        परळी (Parli )तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील शिवाजी पोईनकर यांच्या घरात अडीच वर्षांचा मुलगा सार्थक एकटाच खेळत असताना सापाने दंश केला. साप एवढा विषारी होता की मुलाचा जागीच मृत्यु झाला. साप चावल्यानंतर  तो अडगळीला पडलेल्या जुन्या पेटीत जावून बसला. सार्थकला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता. सर्पदंश झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तोपर्यंत या मुलाला नेमके काय झाले ते कळत नव्हते. डॉक्टरांनी सांगितल्यानंतर घरातील सदस्यांनी घरात इतरत्र पाहिल्यास त्यांना अडगळीला पडलेल्या पेटीत हा साप आढळून आला.सार्थकचा मृत्यु झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.  

Advertisement

Advertisement