Advertisement

भरदिवसा बाप लेकाचा केला खून 

प्रजापत्र | Tuesday, 13/05/2025
बातमी शेअर करा

जालना :भरदिवसा (Crime)राहत्या घरात बाप लेकाची धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना जालन्यातील बदनापूर शहरात घडली आहे. पैशांच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Crime news)करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी २ संशयितांना ताब्यात घेतलं असून, पुढील तपास सुरू आहे.

 

बदनापूर शहरातील शंकर नगर भागात मंगळवारी ही धक्कादायक घटना घडली.(Police) अशोक ढगे (वडील) तर, यश ढगे (मुलगा) अशी हत्या झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. पैशांचा वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आरोपीने दोघांची हत्या त्यांच्याच राहत्या घरात केली असून, वार करून आरोपी फरार झाले आहेत.या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठत पंचनामा केला. पोलिसांच्या तपासात पाच ते सहा जणांनी मिळून ही हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं(Crime) असून, इतर आरोपींच्या शोधासाठी विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.या घटनेने संपूर्ण बदनापूर शहरात खळबळ उडाली (Jalana)असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
 

Advertisement

Advertisement