पुणे : ‘‘विद्यार्थ्यांना लागणारे शैक्षणिक दाखले अर्ज (Student Certificates) केल्यापासून ४८ तासांमध्ये द्यावेत. याकामी हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदोन्नती रोखण्यात येईल,’’असा इशारा महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिला.
राज्य सरकारच्या १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत (Student Certificates) महसूल विभाग आणि भटके विमुक्त विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांना दाखले वितरण समारंभाचे आयोजन केले होते. त्या वेळी बावनकुळे बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सामाजिक न्याय राज्य मंत्री माधुरी मिसाळ आणि इतर नेते व अधिकारी उपस्थित होते.
बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)म्हणाले, ‘‘श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाअंतर्गत महसूल प्रशासनाने प्रत्येक महसुली मंडळात वर्षातून चार शिबिरांचे आयोजन करून लाभार्थींना विविध योजनांचा लाभ देण्याचे काम करावे. तसेच, विद्यार्थ्यांना विविध कामांसाठी लागणारे शैक्षणिक (Student Certificates)दाखले त्यांनी अर्ज केल्यापासून ४८ तासांच्या आत द्यावेत. याबाबत केलेली कार्यवाही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करावी. या कामात अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी हयगय केल्यास त्यांची पदोन्नती रोखली जाईल.’