Advertisement

लग्नाचे आमिष दाखवून महिला पोलिसाची फसवणूक

प्रजापत्र | Friday, 25/04/2025
बातमी शेअर करा

रत्नागिरी : रत्नागिरीतील एका काॅन्स्टेबलने लग्नाचे आमिष दाखवून लग्नास नकार देत पुणे येथील महिला पोलिसाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. याप्रकरणी पुणे येथील वाघेली पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्या(Crime) काॅन्स्टेबलला निलंबित करण्यात आले.

 

अमोल मांजरे असे या काॅन्स्टेबलचे नाव आहे. पोलिस भरतीसाठी तो ट्रेनिंग घेत असलेल्या एका अकॅडमीत त्याची एका महिला स्पर्धकाशी ओळख झाली होती. त्यानंतर सन २०१८ मध्ये या दोघांचीही पोलिस भरतीत नियुक्ती झाली. अमोल रत्नागिरीत तर ती महिला पुणे येथे पोलिस (constable)कर्मचारी म्हणून कार्यरत होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर दोघांच्यात भेटी-गाठी वाढू लागल्या.

त्यानंतर अमोलने त्या महिला पोलिस कर्मचाऱ्याला लग्नाचे आमिष दाखवले. तिने अमोलकडे लग्नाचा तगादा लावला. त्यावेळी त्याने ‘माझ्या आई-वडिलांनी माझ्यासाठी मुलगी पाहिलेली असल्यामुळे मी तुझ्याशी लग्न करू शकणार नाही,’असे सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने याबाबत पुणे येथील (Pune)वाघेली पोलिस स्थानकात दिली.

या तक्रारीची दखल घेत रत्नागिरी पोलिस विभागाने अमोल मांजरे याची प्राथमिक चौकशी होईपर्यंत निलंबन केले आहे. त्याची प्राथमिक चौकशी रत्नागिरी पोलिसच करणार असून, या गुन्ह्याचा तपास पुणे-वाघेली पोलिस करणार आहेत.

Advertisement

Advertisement