Advertisement

शिंदेवाडी फाट्यावर भीषण अपघात

प्रजापत्र | Sunday, 18/10/2026
बातमी शेअर करा

माजलगाव: तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या माजलगाव येथील एका कुटुंबावर काळाने अचानक घाला घातला. शिंदेवाडी फाटा येथे अविनाश बनसोडे यांच्या पेट्रोल पंपासमोर आज त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या हृदयद्रावक दुर्घटनेत कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, माजलगाव येथील हे कुटुंब देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरकडे रवाना झाले होते. मात्र, वाटेत शिंदेवाडी फाट्याजवळ त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता की, गाडीतील चौघांनीही घटनास्थळीच प्राण सोडले.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (शवविच्छेदनासाठी) रुग्णालयात पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या अपघाताचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.

देवीच्या दर्शनासाठी आनंदाने निघालेल्या कुटुंबाचा अर्ध्या वाटेतच असा करुण अंत झाल्याने माजलगाव शहरात मोठी शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisement

Advertisement