Advertisement

मांजरसुंबा बसस्थानकातुन महिलेची बॅग लंपास

प्रजापत्र | Saturday, 29/08/2026
बातमी शेअर करा

बीड दि.२९(प्रतिनिधी): बसमध्ये प्रवास करताना एका महिलेची सोने-चांदी ,रोख रक्कम असलेली बॅग अज्ञात महिलेने लंपास केल्याची घटना गुरुवार (दि.२७) रोजी घडली असून १ लाख ७० हजार ३२८ रुपयांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी अज्ञात महिलेविरुद्ध नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  केला 

  अधिक माहितीनुसार, चंदना विपुल लुदनिया (वय ३६),रा.जिजामाता कॉलनी, जालना ह्या गुरुवार (दि.२७) रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास जालना बसस्थानकावरुन अंबाजोगाईकडे जाणाऱ्या बसमध्ये प्रवास करत होत्या.यावेळी त्यांच्यासोबत शहागड येथून एक अनोळखी महिला बसली होती. मांजरसुंबा बसस्थानकात बसमधून उतरत असताना फिर्यादी यांच्या जवळील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रकम असलेली कापडी बॅग अज्ञात महिलेने चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले, यामध्ये सोन्याचे पेंडल व गंठण, चांदीची चैनजोड, चांदीचे कडे तसेच रोख रक्कम असा एकूण १ लाख ७० हजार ३२८ रुपयांचा ऐवज लंपास केल्या प्रकरणी अज्ञात महिलेविरुद्ध नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  केला असून पुढील तपास श्री.निगुळे हे करत आहेत.

Advertisement

Advertisement