Advertisement

भिवंडीत चार मजली इमारत कोसळून नऊ जणांचा मृत्यु

प्रजापत्र | Friday, 31/07/2026
बातमी शेअर करा

भिवंडीमध्ये गुरुवारी रात्री उशिरा एक दुर्दैवी आणि भीषण दुर्घटना घडली. भिवंडी-निझामपूर महापालिका क्षेत्रातील बालाजी नगर-गंगारामवाडी परिसरात असलेली ‘कोहिनूर अपार्टमेंट’ ही चार मजली निवासी इमारत अचानक पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यु झाला असून, मलब्याखाली अद्याप अनेक नागरिक आणि मजूर अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

  घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाच्या (TDRF) तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, युद्धपातळीवर शोध व बचावकार्य सुरू आहे.अपघाताचे गांभीर्य ओळखून बचाव पथकांनी तात्काळ मलब्यात अडकलेल्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. रात्रभर चाललेल्या मोहिमेत आतापर्यंत दोन जणांना ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.प्राथमिक माहितीनुसार, दुर्घटनेच्या वेळी इमारतीत ६ मजूर आणि ५ स्थानिक रहिवाशांसह सुमारे ११ जण उपस्थित होते. त्यामुळे ढिगाऱ्याखाली अजूनही काही नागरिक अडकले असण्याची शक्यता असून, त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे आणि फ्लड लाईट्सच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबवले जात आहे.

 

Advertisement

Advertisement