Advertisement

परळीत गांज्या विकणाऱ्याविरुद्ध कारवाई

प्रजापत्र | Tuesday, 28/07/2026
बातमी शेअर करा

परळी वैजनाथ दी.28(प्रतिनिधी): शहरातील वाल्मीक नगर परिसरात एक तरुण गांजाच्या पुड्या विक्री करत असल्याची माहिती मिळताच संभाजीनगर पोलीसांनी कारवाई करत १३ हजार ५०० रुपयांचा मु्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार (दि.२५) रोजी सायंकाळी ६.२५ वाजण्याच्या सुमारास वाल्मीक नगर, एकमीनार चौक परिसरातील गुड्डू उर्फ छोटूमियाँ तांबोळी (वय ३०) रा. वाल्मीक नगर, एकमीनार चौक, परळी वैजनाथ याच्या राहत्या घरी छापा टाकण्यात आला.त्याच्या ताब्यातून ८८ ग्रॅम वजनाचा हिरवट- काळपट रंगाचा, गांजासदृश अमली पदार्थ जप्त करण्यात आला. गांज्याच्या २७ छोट्या पुड्यांमध्ये विक्रीसाठी तयार ठेवण्यात आला होता. प्रत्येकी ५०० रुपये किंमतीप्रमाणे या अमली पदार्थाची एकूण किंमत १३ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७९/२०२६ नोंद करण्यात आला असून एनडीपीएस कायदा, १९८५ अंतर्गत कलम ८(क), २०(ब)(ii)(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई सपोनि.अनमोल केदार यांनी केली. पुढील तपास सपोनि. गोंड करीत आहेत.

Advertisement

Advertisement