बीड दि.१३(प्रतिनिधी): गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे खुलेआम गुटख्याची विक्री सुरू सुरु असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळताच रविवार (दि.१३) रोजी कारवाई करत ७ लाख ७५ हजार ५४० रुपयांचा गुटखा जप्त केला असून आरोपीविरुद्ध लवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी कि,पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की,अमोल महादेवराव धोंडरे हा मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा साठवून त्याची विक्री करत आहे. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवार (दि.१३) रोजी कारवाई करत आरोपीच्या ताब्यातून एकूण ७ लाख ७५ हजार ५४० किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि शेखर औटे, पो.ह.अंकुश वरपे, गोविंद राख, पो.अं.बबन सलगर,चालक नितीन वडमारे यांनी केली.

