Advertisement

अवैध गुटखा वाहतुकीवर कारवाई 

प्रजापत्र | Friday, 10/07/2026
बातमी शेअर करा

 बीड दि.१० (प्रतिनिधी): शहरातील बीड-बार्शी रोडवरील लॉ कॉलेजसमोर पेठ बीड पोलिसांच्या डीबी पथकाने सापळा रचून गुटखा वाहतुकीविरोधात गुरुवार (दि.९)रोजी रात्री कारवाई करत १० लाख ५७ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

   अधिक माहितीनुसार,सलाउद्दिन शेख (वय ३४), रा. मोमीनपुरा, पेठ बीड आणि अरबाज मुसा शेख (वय २२), मूळ रा. उफळी, ता. वडवणी, सध्या युनूस पार्क, तेलगाव रोड, बीड हे दोघे स्विफ्ट कार व इनोव्हा वाहनातून हिरा पान मसाला, रॉयल तंबाखू व इतर गुटखा विक्रीच्या उद्देशाने वाहतूक करत असल्याची माहिती   पेठ बीड पोलिसांच्या डीबी पथकाला मिळताच गुरुवार (दि.९) रोजी रात्री ९:३० च्या सुमारास कारवाई करत दोन वाहने असा एकूण  १० लाख ५७ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन्ही आरोपींना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत,अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख व उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ बीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश केळे,सपोनि श्री.उबाळे,पोउनि मन्सूर शहा,पो.हनितीन राठोड,पो.अं.अल्ताफ शेख,मोटे,औदुंबर गिरी,पांडुरंग परझने तसेच चालक नवले यांनी केली.

Advertisement

Advertisement