Advertisement

कत्तलसाठी जनावरे घेऊन जाणारा कंटेनर पकडला 

प्रजापत्र | Monday, 29/06/2026
बातमी शेअर करा

 केज दि.२९(प्रतिनिधी) गोरक्षकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे केज पोलिसांनी पहाटेच्या सुमारास कत्तलीसाठी नेले जात असल्याचा संशय असलेला कंटेनर व पिकअप मधील ३७ जनावरांची सुटका करण्यात आली असून ट्रक चालक फरार झाला आहे.
  मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार (दि.२९) रोजी पहाटे सुमारे 3 वाजता आंबाजोगाई–केज रस्त्यावर एएच २० डीइ ३०२९ क्रमांकाच्या कंटेनरमधून गोवंश, जनावरे वाहतूक होत असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली. त्यांनी तात्काळ डायल ११२ वर संपर्क साधून पोलिसांना याबाबत कळवले. केज पोलिसांनी तातडीने सापळा रचून पिसेगाव जवळील पेट्रोल पंपाजवळ कंटेनर अडवला. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच कंटेनरचा चालक अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाला. तपासणीदरम्यान कंटेनरमध्ये २५ देशी नंदी (बैल) आढळून आले. याशिवाय एका बोलेरो पिकअपमधून ७ देशी गोवंशीय प्राणी मिळून आले. अशा एकूण ३७ गोवंशीय प्राण्यांची सुटका करण्यात आली.ताब्यात घेतलेले सर्व गोवंश केज पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांना सुरक्षितपणे गोशाळेत सोडण्यात आले. सकाळी ७ वाजता पोलिसांनी पंचनामा केला असून जनावरे नेमकी कुठून आणली होती आणि त्यांना कुठे नेले जात होते, याचा तपास केज पोलीस करत आहेत.

 

Advertisement

Advertisement