बीड दि.२२(प्रतिनिधी): तालुक्यातील मुळुकवाडी येथे मध्यरात्री चोरट्यांनी घर फोडून सुमारे साडेचार लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना मध्यरात्री घडली आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.
मुळुकवाडी येथील संदिप अंबादास ढास हे गाय आजारी असल्याने रात्री शेतात मुक्कामी होते. दरम्यान मध्यरात्री सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास द्वारकाबाई ढास यांना शेजारील खोलीत आवाज आल्याने जाग आली. त्यांनी घराच्या गच्चीवर झोपलेल्या प्रतिक्षा ढास यांना याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी फोनवरून शेतात असलेल्या संदिप ढास यांना चोरीची माहिती दिली. संदिप ढास यांनी तातडीने घरी येऊन पाहणी केली असता घरातील दोन्ही कपाटे फोडलेल्या अवस्थेत आढळून आली. कपडे अस्ताव्यस्त पडलेले होते तसेच सोन्याचे दागिने ठेवण्याच्या डब्या उघड्यावर पडलेल्या दिसून आल्या. घरातील ३ तोळे सोने आणि खत खरेदीसाठी ठेवलेली ५० हजार रुपयांची रोकड असा एकूण सुमारे साडेचार लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे त्यांनी सांगितले.या घटनेचा पुढील तपास नेकनूर पोलीस करत आहेत.

बातमी शेअर करा
