Advertisement

बीड शहरात नवविवाहितेची तर जिरेवाडीत १६ वर्षीय मुलाची आत्महत्या

प्रजापत्र | Sunday, 14/06/2026
बातमी शेअर करा

  बीड दि.१४(प्रतिनिधी): शहरात आणि परिसरात आज सकाळपासून दुपारपर्यंत आत्महत्येच्या दोन घटना घडल्या आहेत. बीडमध्ये नवविवाहितेने तर जिरेवाडीत १६ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
बीड शहरापासून जवळच असलेल्या जिरेवाडी येथील आदर्श लक्ष्मण काकडे (वय १६) या मुलाने आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात पत्र्याच्या लोखंडी पाईपला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. त्याला तातडीने जिल्हा रूग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. दुसरी घटना बीड शहरातील शाहू नगर भागात घडली असून शितल अशोक सोन्नर (वय १९) या नवविवाहितेने साडीच्या साहाय्याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. दोन महिन्यापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.

Advertisement

Advertisement