बीड दि.१२(प्रतिनिधी):शहरातील गांधी नगर भागात एक तरुण खंजीर घेऊन फिरत असल्याची माहिती पेठ बीड पोलिसांना मिळताच त्यास शस्त्रासह ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस स्टेशन पेठ बीड हद्दीतील गांधी नगर भागात अक्षय रामलिंग वाघमारे (वय ३०) रा.गांधी नगर पेठ बीड हा तरुण खंजीर शस्त्र घेऊन फिरत असल्याबाबत माहीती मिळाल्याने त्यास लोखंडी खंजीर शस्त्रासह शुक्रवार (दि.१२)रोजी रात्री ताब्यात घेऊन त्याच्यावर पेठ बीड पोलीस ठाण्यात कलम ४/२५ भारतीय शस्त्र कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.सदरील कारवाई पो.नि निलेश केळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोह.नितेश माने,श्री.चांदणे,पोअं.श्री.गिरी,श्री.परजणे,विष्णु गुजर यांनी केली आहे.
बातमी शेअर करा

