Advertisement

भरधाव टेम्पोची ट्रॅक्टरला धडक

प्रजापत्र | Sunday, 07/06/2026
बातमी शेअर करा

 बीड दि.७(प्रतिनिधी):भरधाव वेगातील टेम्पोने ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार (दि.६) रोजी सायंकाळी बीड-गेवराई महामार्गावरील पेंडगाव पासून जवळच असलेल्या हिंगणी फाट्यावर घडली.
   सोलापुर जिल्ह्यातील कुडूवाडी येथून बीडमार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जात असलेल्या ट्रॅक्टरला एका आयशर टेम्पोने जोराची धडक दिली. धडक एवढी जोराची होती की ट्रॅक्टर आणि टेम्पो रोडच्या खाली जाऊन एका शेतातील झाडावर आदळले. या अपघातात अंगद राजेंद्र कन्हेरे (वय ४०) रा. रणदिवेवाडी ता. माढा जि. सोलापुर यांचा मृत्यु झाला तर जालिंदर नामदेव बाबर (वय २५) रा. गढी ता. गेवराई हे गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

 

Advertisement

Advertisement