Advertisement

 लिंबागणेशमधील खून प्रकरणातील आरोपी जेरबंद 

प्रजापत्र | Friday, 05/06/2026
बातमी शेअर करा

नेकनूर दि.५ (वार्ताहार): लिंबागणेश अंजनवती मार्गावरील गणेशमाळ परिसरात सोमवारी सकाळी एका तरुणाचा रस्त्याच्या बाजूला संशयास्पद मृतदेह आढळला होता.यातील दोन आरोपींना नेकनूर पोलिसांनी गुरुवार (दि.४) रोजी रात्री जेरबंद केले असून पुढील तपास सुरु आहे.  
  बीड तालुक्यातील लिंबागणेश अंजनवती मार्गावरील गणेशमाळ परिसरात सोमवारी सकाळी एका तरुणाचा रस्त्याच्या बाजूला संशयास्पद मृतदेह आढळला होता  किरण बंडू सोनावणे रा.अंजनवती मयताची ओळख पटल्यानंतर त्याचा अज्ञात आरोपीने दोरीने आवळून खून केल्याचे उघड झाल्यानंतर नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.सदरील गुन्ह्याचा तपास नेकनूर पोलिसांनी जलतगतीने सुरु केला होता गुरुवार (दि.४) रोजी रात्री उशिरा दशरथ परदेशी (वय २५),धीरज येडे (वय २६) दोघे रा. अंजनवती ता.जि. बीड या दोन आरोपींना नवी मुंबई, तळोजा येथून ताब्यात घेऊन चौकशीअंती अटक करण्यात आली. आरोपींकडून गुन्ह्याची कबुली मिळाल्याने सदर खूनाचा गुन्हा निष्पन्न झाला.सदरील कारवाई नेकनूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि मंगेश साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे सफौं.संजय गुंड, पोह.दत्ता बळवंत, विशाल क्षीरसागर, मन्सूर शेख, गणेश परजने, बाबासाहेब साळुंखे, पोशिं बालाजी ढाकणे, सुधाकर जायभाये यांनी केली.

 

Advertisement

Advertisement