बीड दि.२(प्रतिनिधी): शहरातील गांधी नगर परिसरात अवैध सिंधी दारू विक्रेत्यावर पेठ बीड पोलिसांनी सोमवार (दि.१) रोजी कारवाई करत २४० लिटर दारू अंदाजे १० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
बीड शहरातील गांधी नगर परिसरात अवैध सिंधी दारू विक्री करत असताना रामेश्वर कचरू गायकवाड (वय ३७), रा. गांधी नगर, पेठ बीड यास ताब्यात घेत त्याच्याकडून २४० लिटर दारू अंदाजे १० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पेठ बीड पोलिसांनी दारू, मटका, गुटखा आणि जुगार अड्ड्यांविरोधात मोहीम अधिक तीव्र केली असून अवैध दारू विक्री करणाऱ्यांवरही आता विशेष लक्ष केंद्रीत केले जात आहे.सदरील कारवाई पोलीस निरीक्षक मारोती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गांधी नगर बिट अंमलदार व पोलीस पथकाने केली.
बातमी शेअर करा

