बीड-जिल्ह्याच्या पोलीस दलात बदल्यांचे अधिकार घटकप्रमुखांना असतात.अधिकाऱ्यांची असेल अथवा कर्मचाऱ्यांची बदली कुठे करायची? कुठे नाही? हे सर्वस्व त्यांच्या अधिकाराचाच विषय असतो.यात कोणीही सल्ले अथवा मार्गदर्शन करण्याची गरज नसते.पण एकीकडे बदल्यांच्या प्रक्रियेत पारदर्शीपणाचा आव आणत राजकीय वशिलेबाजी चालणार नाही,जुन्या अधिकाऱ्यांना पुन्हा 'ठाणेदारा'ची संधी मिळणार नाही अश्या वल्गना करायच्या अन दुसरीकडे मर्जीतील अधिकाऱ्यांना पुन्हा संधी द्यायची हा जो 'नवा' पॅटर्न सुरु झालाय त्याच्या चर्चा सध्या बीडमध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर आता सुरु आहेत.शीतलकुमार बल्लाळ, स्वप्नील उनवणे,विनोद घोळवे या पोलीस निरीक्षकांच्या गळ्यात पुन्हा एकदा प्रभारी पदाची माळ पडलीच आहे पण याशिवाय सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांचा अंभोऱ्यातील कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांना थेट नेकनूर पोलीस ठाण्याचा कारभार हाती देण्यात आला आहे.ते जिल्हातील एकमेव सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत ज्यांना एसपींनी पुन्हा एकदा नव्याने काम करण्याची संधी दिली आहे.त्यामुळे आता या बदल्या आता निकषापेक्षा मर्जीतील अधिकाऱ्यांसाठीच जास्त फायदेशीर ठरल्याच्या चर्चा सुरु झाल्यात.
बीडच्या पोलीस दलात बदल्यांचे सत्र सुरु आहे.चार दिवसांपूर्वी ८० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना मुदतवाढ दिल्यानंतर आता प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्यात एसपींच्या भूमिकेमुळे अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.प्रभारी अधिकाऱ्यांना पुन्हा ठाणे मिळणार नाहीत,नवीन अधिकाऱ्यांना संधी दिली जाईल असे एकीकडे नवनीत कॉवत वारंवार सांगत होते.त्यांनी त्यानुसार काही अधिकाऱ्यांचे पुनर्वसन ही केले.मात्र बदल्यात त्यांनी पूर्णपणे पारदर्शीपणा सांगितल्याप्रमाणे आणला नाही. काल अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये ४० जणांचा समावेश केला.यातील अनेकांना पहिल्यांदाच प्रभारी पद नवनीत कॉवत यांनी दिलेही.त्याबद्दल त्यांचे अभिनंदनच करायला हवे.बीडमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांना कोणताही प्रभारी पदाचा अनुभव नसताना थेट ठाणेदार पदाची सूत्रे हातात देणे सोपे नाही.अगदी एकही रुपयांचा प्रोटोकॉल न घेता त्यांनी अनेकांना प्रभारी पद दिल्याने एसपींचा निर्णय निर्णय कौतुकास्पदच म्हणावा असा आहे.मात्र दुर्दैवाने यात त्यांनी सरसकटीकरणं धोरण आणले नाही.शहर पोलीस ठाण्याचे शीतलकुमार बल्लाळ,पाटोद्याचे विनोद घोळवे,केजचे स्वप्नील उनवणे यांच्या बदल्या करताना त्यांना अदलाबदली करत प्रभारी पद दिले.तर अंभोऱ्यात कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही मंगेश साळवे यांना दुसऱ्यांदा नेकनूरसारखे ठाणे देऊन एसपींनी स्वतःच्याच नियमांना बगल दिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे बदल्यांमध्ये नवीन अधिकाऱ्यांना संधी देण्यात येईल असे सांगायचे आणि दुसरीकडे मात्र मर्जीतील अधिकाऱ्यांना पुन्हा संधी मिळणार असेल तर मग एसपींची भूमिका नेमकी खरी कोणती आहे?हे कळायला देखील मार्ग नाही.
मंगेश साळवेंना लॉटरी.....
शीतलकुमार बल्लाळ,विनोद घोळवे आणि स्वप्नील उनवणे यांच्या बदल्या करताना त्यांचे पुनर्वसन एकवेळी समजू.जिल्ह्यात पोलीस निरीक्षक कमी आहेत.त्यामुळे यांना संधी मिळाली असा त्याचा अर्थही होऊ शकतो पण नेकनूरमध्ये मंगेश साळवे यांना नियुक्ती देताना एसपींनी नेमका कोणता निकष त्याठिकाणी लावला त्याचे उत्तरं स्वतः एसपींकडे देखील नसेल.कारण बदल्यांच्या प्रक्रियेत वारंवार भूमिका स्पष्ट करताना जुन्या अधिकाऱ्यांना संधी मिळणार नाही असं ठणकावून सांगायचं आणि पुन्हा मंगेश साळवे यांच्यासारख्या एकमेव एपीआयला ठाणेदार पदाची लॉटरी लागणार असेल तर एसपींच्या भूमिका मर्जीतील अधिकाऱ्यांसाठी वेगळ्या असतात असा त्याचा दुसरा अर्थ होतो का?
| अधिकाऱ्यांचे नाव | सध्याची नेमणूक | नवीन नेमणूक |
| पोनि.शीतलकुमार बल्लाळ | शहर पोलीस ठाणे | केज पोलीस ठाणे |
| पोनि.विनोद घोळवे पाटोदा | पाटोदा | बीड शहर |
| पोनि.वैभव पाटील | नियंत्रण कक्ष | प्रभारी वाहतूक शाखा |
| पोनि.प्रवीणकुमार बांगर | शिवाजीनगर | नियंत्रण कक्ष |
| पोनि.उमाकांत कस्तुरे | होम डीवायएसपी | प्रभारी पाटोदा |
| पोनि.स्वप्नील उनवणे | केज | शिवाजीनगर |
| सपोनि संदीप मांजरमे | केज | प्रभारी युसूफवडगाव |
| सपोनि राजेंद्र घुगे | अंबाजोगाई शहर | धारूर |
| पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले | बर्दापूर | अंबाजोगाई शहर |
| सपोनि जाधवर संतोष महादेव | अंबाजोगाई शहर(पिंक पथक) | केज पोलीस ठाणे |
| सपोनि/कोटकर सतिष पांडुरंग | गेवराई | प्रभारी अंमळनेर |
| सपोनि/लांडगे अतुलकुमार सिताराम | शिवाजीनगर पिंक बीड | गेवराई पोलीस ठाणे |
| सपोनि दहिफळे गोरकनाथ बाबासाहेब | सिरसाळा | पिंक पथक बीड |
| सपोनि/जगताप रंगनाथ मुरलीधर | अंबाजोगाई ग्रा | शिवाजीनगर बीड |
| सपोनि/शेंडगे मच्छिंद्रनाथ गंगाधर | यु.वडगाव | पिंक पथक माजलगाव |
| सपोनि वाघमोडे देविदास बाळासाहेब | धारूर | पिंक पथक गेवराई |
| सपोनि / घुगे मधुसूदन रामकृष्ण | पिंपळनेर | पिंक पथक अंबाजोगाई |
| सपोनि नरवाडे विजय आनंद | आष्टी | प्रभारी पिंपळनेर ठाणे |
| सपोनि/मुंडे प्रल्हाद परभतराव | माजलगाव शहर | शिवाजीनगर पो.ठाणे |
| सपोनि राठोड बाबा भिलू | बीड शहर | प्रभारी सिरसाळा ठाणे |
| सपोनि साळवे मंगेश भागवत | अंभोरा | प्रभारी नेकनूर पोलीस ठाणे |
| सपोनि.उबाळे नित्यानंद नाथा | पेठ बीड | अंबाजोगाई शहर |
| सपोनि.सोनवळे देविदास उत्तमराव | माजलगाव ग्रा.- | आष्टी पोलीस ठाणे |
| सपोनि हिंगे विक्रांत दिलीप | आष्टी | प्रभारी अंभोरा पोलीस ठाणे |
| सपोनि लंके दिपक दत्तात्रय | गेवराई | केज पोलीस ठाणे |
| सपोनि/गडवे राजेश रंगनाथ | पिंक पथक गेवराई | प्रभारी शिरुर पोलीस ठाणे |
| पोउपनि/औटे शेखर बळीराम | टी.ए.सी बीड | स्थानिक गुन्हे शाखा |
| पोउपनि/शिंदे अनिल तुकाराम | संभाजीनगर परळी | अंबाजोगाई शहर ठाणे |
| पोउपनि/माकणे केरबा बाबुराव | माजलगाव शहर | SDPO माजलगाव Reader |
| पोउपनि/कोळी स्वप्निल दिलीप | तलवडा | माजलगाव शहर ठाणे |
| पोउपनि/कुकलारे संजय रामराव | बीड ग्रामीण | वाहतूक शाखा |
| पोउपनि रोकडे अप्पासाहेब रमेशराव | नेकनुर | गेवराई पोलीस ठाणे |
| पोउपनि/शिंदे श्रीकृष्ण दत्तु | आष्टी | अंभोरा पोलीस ठाणे |
| पोउपनि/गोलवाल अर्जुन चैनसिंग | पिंपळनेर | SDPO बीड Reader |
| पोउपनि/भालेराव प्रदिप मोतिराम | पो.नि.क बीड | CRO-1 year Extension |
| पोउपनि/काकरवाल नितीन खुशालसिंग | बीड ग्रामीण | नेकनूर पोलीस ठाणे |
| पोउपनि/राठोड राजु धनसिंग | वडवणी | तलवडा पोलीस ठाणे |
| पोउपनि खांडखुळे देविदास बाबुआप्पा | शिरुर का- | डीएसबी |
|
पोउपनि/जाधव आनंद बब्रुवान पोउपनि/लहाणे स्वाती नाना
|
सिरसाळा सायबर पोस्टे बीड
|
शिरुर कासार पोलीस ठाणे Cyber PS-1 year Extension
|

