बीड दि. १९ (प्रतिनिधी ) ; 'नीट' पेपर फुटी प्रकरणात कोचिंग क्लासेसचे 'अम्बॅसेडर ' म्हणवल्या जाणाऱ्या शिवराज मोटेगावकरला सीबीआयने अटक केल्यानंतर लातूरच्या लागतच जिल्हा असलेल्या बीड जिल्ह्यात खळबळ माजली आहे. बीड जिल्ह्यातील अनेक कोचिंग क्लासेससाठी शिवराज मोटेगावकर
'अम्बॅसेडर ' होता, त्याचे बीड जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर संबंध देखील होते.. त्यामुळे आता शिवराज मोटेगावकरच्या बीड जिल्ह्यातील 'नेटवर्क ' ची देखील चौकशी करावी अशी मागणी मोठ्याप्रमाणावर होत असून सोशल मीडियामध्ये तास सूर जोरात आहे.
'नीट' पेपर फुटीच्या प्रकरणात थेट लातूरच्या शिवराज मोटेगावकरचा सहभाग आढळून आल्यानंतर आता त्याच्या अटकेने बीड जिल्ह्यातील शैक्षणिक विश्व देखील हादरले आहे. शिवराज मोटेगावकर हे नाव बीड जिल्ह्यातील अनेक क्लासेससाठी 'अम्बॅसेडर ' होते. काही संघटनांच्या लेटरहेडवर देखील शिवराज मोटेगावकरचा उल्लेख 'ब्रँड अम्बॅसेडर ' म्हणून केला जायचा असे सांगितले जाते. त्यामुळे आता बीड जिल्ह्यात मोटेगावकरच्या संबंधित कोण कोण आहेत आणि त्याचे जाळे नेमके किती विस्तारले आहे याची चौकशी केली जाणे आवश्यक असल्याचा सूर समाज माध्यमांच्या मधून लावला जात आहे. २०२४ मध्ये ज्यावेळी 'नीट' चा पेपर फुटला होता, त्यावेळी देखील बीड जिल्ह्यातील लोकांच्या चौकशीची मागणी केली गेली होती.आता लातूरच्या शिवराज मोटेगावकरला थेट अटक झाल्याने त्याच्या संपर्कात बीडमधील कोणी होते का ? आणि त्याची 'व्यावसायिकता ' बीडमधील कोणाच्या उपयोगाला आली आहे का ? याची देखील चौकशी होणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. शिवराज मोटेगावकरची झालेली अटक आणि यातील आणखी एक आरोपी असलेल्या कुलकर्णीचा बीडशी असलेला संबंध यामुळे या आरोपींची बीडमध्ये कोणाशी 'केमिस्ट्री ' जुळली होती का हा मुद्दा देखील तपास यंत्रणांसाठी महत्वाचा ठरणार आहे.
बातमी शेअर करा

