शिरुर कासार दि.१९(प्रतिनिधी):तालुक्यातील मानूर येथे ट्रॅक्टर व दुचाकीच्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यु झाल्याची घटना मंगळवार (दि.१९) रोजी रात्री १० च्या सुमारास घडली.
सविस्तर माहिती अशी की,पाथर्डी हुन अंबिकानगरला दुचाकीवरून येत असताना मानूर येथील दहिफळे वस्ती जवळील हॉटेल समाधानच्या समोर अचानक ट्रॅक्टर आल्याने दुचाकी ट्रॅक्टर वर जाऊन आदळली.दुचाकीमध्ये पेट्रोल जास्त असल्यामुळे गाडीने पेट घेतला या भीषण अपघातात इकबाल अत्तार (वय ३२) व शफिक शेख (वय ४०) रा.अंबिकानगर ता.पाथर्डी जि. आहिल्यानागर या दोघांचाही जागीच मृत्यु झाला.घटनेची माहिती मिळताच शिरुर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.या घटनेमुळे अंबिकानगर गावावर शोककळा पसरली असून अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.
बातमी शेअर करा

