केज दि.८(प्रतिनिधी):शहरातील रोजा मोहल्ला येथून अज्ञात चोरट्यांनी घराच्या पाठीमागे उभा केलेला टेम्पो लंपास केल्याची घटना बुधवार (दि.६) रोजी घडली असून या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या एका दिवसात उघड करत दोन सराईत चोरट्यांना ताब्यात घेतले आहे.
नसीर कुरेशी रा.रोजा मोहल्ला केज यांचा आयशर टेम्पो क्रमांक .एमएच. १५ डीके ४२४१ हा घराच्या पाठीमागील बाजुस असलेल्या मोकळ्या उभा केला होता.बुधवार (दि.६) रोजी सकाळी सदरील टेम्पो अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे निदर्शनात आले.असता केज पोलीस ठाण्यात जात फिर्याद दाखल करण्यात आली त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर घटनास्थळास भेट दित सी.सी.टी.व्ही फुटेज तपासण्यात आले. सदर फुटेज मध्ये दोन ईसम टेम्पो चोरी करत असताना दिसुन आले.सदरच्या दोन्ही ईसमाबाबत माहीती घेतली १) उमरे ऊर्फ पाप्या मुस्ताक फारुकी रा. रोजा मोहल्ला केज व २) आवेश ऊर्फ आवडया खाँजा शेख रा. कोकीजपरी केज असल्याचे समजले. दोघांना गुरुवार (दि.७) रोजी रात्री ताब्यात घेत विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याचे कबुल केले. चोरी केलेला टेम्पो त्यांनी धारुर येथील एम.आय.डी.सी परीसरात उभा केला असल्याचे सांगितले. सदरील टेम्पो त्यांच्याकडून जप्त करुन दोन्ही आरोपीतांना मुद्येमाला सह पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन केज यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक,अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोउपनि महेश विघ्ने, पोह.बप्पासाहेब घोडके, जफर पठाण, महेश जोगदंड, दिलीप गित्ते,गणेश मराडे यांनी केली आहे.

बातमी शेअर करा
