बीड दि.२(प्रतिनिधी): शिरूर कासार तालुक्यातील हाटकरवाडी येथे घरफोडी करून फरार झालेल्या एका चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करत त्यांच्याकडून १६ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
रामभाऊ विठ्ठल पुरणे रा.हाटकरवाडी ता.शिरुर कासार हे घरासमोर झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने घरात घुसून सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेल्याची फिर्याद दिली होती. त्यावरुन दि.२४-०१- २०२६ रोजी पोलीस ठाणे पाटोदा येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत होते. दरम्यान गुप्त खबऱ्याकडून हा गुन्हा यश काग्रेस चव्हाण याने केला असून तो सध्या खोकरमोहा येथे त्याच्या घरी असल्याची खात्री लायक माहिती मिळाली. माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने खोकरमोहा ता. शिरुर कासार येथे जाऊन छापा टाकून त्यास ताब्यात घेतले आहे. त्याकडून १६ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीला पुढील तपासासाठी \पाटोदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पो.ह आनंद मस्के, बाळू सानप, विकास राठोड, अशोक दुबाले, महीला पोलीस स्वाती मुंडे, बबन सलगर, मनोज परजणे, चालक सिध्देश्वर मांजरे यांनी केली आहे.

