बीड: केज विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय हालचाल झाली असून बीडचे माजी जिल्हा शल्य चिकित्सक (Beed CS)तथा कामगार आरोग्य विमा विभागाचे संचालक डॉ. अशोक थोरात (Dr Ashok Thorat)यांच्या पत्नी डॉ. प्रतिभा थोरात यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.
केज विधानसभा (Kej assembaly) मतदारसंघात आणि बीड जिल्ह्यात डॉ. अशोक थोरात यांचे मोठे सामाजिक वलय आहे.आता त्यांच्या पत्नी डॉ. प्रतिभा थोरात यांनी थेट शिवसेनेत (Shivsena )प्रवेश केला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मूळूक आणि अनिल जगताप यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. प्रतिभा थोरात यांच्या शिवसेना प्रवेशाने केज विधानसभा मतदारसंघातील राजकीय (Political )समीकरणांवर मोठा परिणाम अपेक्षित आहे. काही दिवसांपूर्वीच केजच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला होता, त्यामुळे शिवसेनेने या मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे.
डॉ. प्रतिभा थोरात यांच्या या प्रवेशावेळी संगीता चव्हाण यांच्यासह दादासाहेब ससाणे आणि इतरांची उपस्थिती होती.

प्रजापत्र | Thursday, 30/04/2026
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा
