बीड दि.२१(प्रतिनिधी): शहरात चाकूचा धाक दाखवून रॉबरी करणाऱ्या फरार आरोपीला बीड शहर पोलिसांनी अटक केली आहे.गंभीर गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेतल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
रविवार (दि.५) रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास बस स्थानकासमोरील वंदना हॉटेल परिसरात ही घटना घडली होती. उमेश सुनील पारिक (वय ३०) रा. काशी नगर, जालना रोड, बीड यांच्यावर आरोपीने चाकूने हल्ला करत मारहाण केली आणि जबरदस्तीने त्यांच्या खिशातील ओप्पो A11 कंपनीचा मोबाईल अंदाजे किंमत २० हजार रुपये लुटून घटनास्थळावरून पळ काढला होता. या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाले होते.या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचा प्रभावी वापर करत आरोपीचा माग काढला. अखेर विनोद मुळे रा. भाजी मंडई, बीड यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत,अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहर पोलीस ठाणे निरीक्षक शितलकुमार बल्लाळ,पो.ह.जाधव त्यांच्या पथकाने केली.

बातमी शेअर करा
