Advertisement

टेम्पोसह शेतीमाल आणि दुचाकी लंपास

प्रजापत्र | Sunday, 12/04/2026
बातमी शेअर करा

 बीड दि.१२(प्रतिनिधी): शहरासह ग्रामीण भागात चोरट्यांनी उच्छाद मांडला असून ८,९ एप्रिल रोजी पेठ बीड, नांदूरघाट आणि सायगाव परिसरातून टेम्पो, दुचाकी आणि शेतीमालाची चोरी झाल्याचे समोर आले आहे. या घटनांमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
     पेठ बीड परिसरातील हॉटेल चंद्रलोक समोरून अशफाक मोमीन यांचा अशोक लेलँड टेम्पो आणि त्यातील सतरा हजारांचा मसाला असा एकूण एक लाख सत्त्याऐंशी हजार रुपयांचा माल अज्ञात चोरट्यांनी पळवला. दुसरीकडे, नांदूरघाट ते यु वडगाव प्रवासादरम्यान चालत्या ट्रकमधून अज्ञात चोरट्याने पाच हजार आठशे पंच्याहत्तर रुपये किमतीची हरभऱ्याची दोन पोते लंपास केली. तसेच, सायगाव येथील भारज पाटी येथून परमेश्वर मस्के यांची वीस हजार रुपयांची दुचाकी चोरीला गेली आहे. या सर्व प्रकरणांत शुक्रवार (दि.१०) रोजी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Advertisement

Advertisement